क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही फिट राहा, आनंदी राहा - आ. प्रशांत ठाकूर
पनवेल दि.०५ (संजय कदम) : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीनियर क्रिकेट टी पनवेलच्या नवीन सीझन पर्वाचा शुभारंभ पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी शुभेच्छा देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही फिट राहा, आनंदी राहा अश्या शुभेच्छा त्यांनी दिल्या
पनवेल तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरु झालेल्या या क्रिकेटच्या नवीन हंगामाच्या शुभारंभावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक भाई नितीन पाटील, क्रिकेट टी चे कर्णधार प्रमोद पाटील, उपकर्णधार राजेंद्र पाटील, खजिनदार त्रिशूल म्हात्रे, आधारस्तंभ उद्योजक संजय पाटकर, ऍड चंद्रशेखर वाडकर, माजी नगराधयक्ष सईद मुल्ला,
माजी नगर सेवक नंदू पटवर्धन, गोपाळ भोईर, हरी आखाडे, प्रफुल पेंडसे, राजेश शेट्टीयार, भाई सुभाष पाटील, विजय पाटील, अजय पाटील, संदीप पाटील, अभिजीत पाटील, जयेंद्र पाटील, डॉ ययाती गांधी,डॉ आशिष गांधी, डॉ संतोष जाधव, डॉ .रवींद्र राऊत, मिलिंद जोशी, नितीन पोवळे, प्रशांत मोकल, सागर आठवणे, कुणाल सावंत, बाळू देशमुख, केदार माने,
लक्ष्मण कुंभार, नामदेव पाटेकर, सचिन डांगरे, हेमंत अंबेतकर, अशोक भगत आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांचे प्रास्तविक व आभार प्रदर्शन डॉ. नितीन पोवळे यांनी केले.
Tags
पनवेल