रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे महेंद्रशेठ घरत यांनी हाती घेतल्यापासून रायगड जिल्ह्यात ते विविध सामाजिक उपक्रम राबवून कॉंग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य आणण्याचे काम करत आहे.
गव्हाण येथे आरोग्य शिबीर, उलवे येथे ओबीसी मेळावा, कोकण विभाग कॉंग्रेस मेळावा, क्रिकेट स्पर्धा, दहीहंडी व आता उलवे नोड येथे अतिशय सुनियोजित भव्य गरबा व दांडिया कार्यक्रमाचे आयोजन महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने करण्यात आले होते.
आयोजकांतर्फे रोज आकर्षक दहा ते पंधरा बक्षिसे देण्यात येत होती.शेवटच्या दिवशी तर बंपर बक्षिसे देण्यात आली.यामध्ये LED TV, ओव्हन, होम थिएटर, मिक्सर, व इतर अशी अनेक बक्षिसे देण्यात आली.
या दांडिया कार्यक्रमासाठी सामाजिक, कला, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली व अतिशय सुरेख नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.पहिल्याच वर्षी आयोजकांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
Tags
पनवेल