पनवेल दि.०६ (संजय कदम) : श्री सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा संस्था, करंजाडे, यांच्यातर्फे मंगेश शेलार यांनी सलग पाचव्यांदा नवरात्री महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केला होता.
नवरात्री महोत्सवाची सांगता विजयादशमी-दसऱ्याच्या दिवशी एका विशेष कार्यक्रमाने झाली. भारतात दर वीस मिनिटाला एक बलात्कार होतो, अशी सरकारी आकडेवारी सांगते आहे. महिलांच्या स्वसंरक्षणासाठी "संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान" यांचे शिवकालीन शस्त्रांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके सौ. शोनल मेहरोळे यांच्या मार्फत दाखवण्यात आली.
यात लाठीकाठी, बनाटी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला इत्यादी शस्त्राचा समावेश होता. उपस्थित नागरिकांनी घोषणा देऊन त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . "संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र, रायगड जिल्हा संयोजिका सौ. शितलताई निकम यांचे या विषयावरचे उल्लेखनीय भाषण झाले. सौ.मनिषा म्हात्रे-निमसे यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजक मंगेश शेलार हे महिलांचे स्वसंरक्षण या विषयात नियमित ट्रेनिंग सुरू करण्याचे नियोजन करत आहेत. तसेच ते सतत विविध सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात पुढाकार घेत असतात.
Tags
पनवेल