. जात पडताळणीसाठी दोन वेळा काऊंटर चालू करून नागरिकांना दिलासा द्यावा -शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर











पनवेल दि.१४ (संजय कदम): जात पडताळणी संबंधी सर्व पेपर्स जमा करण्यासाठी पनवेलमध्ये प्रत्येक महिन्याच्या दोन वेळा काऊंटर चालू करून नागरीकांचा होणारा त्रास कमी करण्याबाबतचे निवेदन शिवसेना पनवेल तालुका प्रमुख  विश्वास पेटकर यांनी जात पडताळणी विभागाला दिले आहे.

  

         या निवेदनात म्हटले आहे की, जात पडताळणी संबंधी कागदपत्रे जमा करण्याकरीता अलिबागमध्ये जाणे-येणे प्रत्येक विदयार्थ्याला व पालकांना खुप त्रासदायक होत असून आर्थिक भुर्दंड सुध्दा होतो. त्यातच एखादा पेपर्स कमी असल्यास त्या पालकांना किंवा विदयार्थ्यांना परत जाणे-येणे त्रासदायक होते.


 सार्वजनिक बांधकाम ऑफिस (पनवेल), जिल्हा न्यायालयाचे ऑफिस (पनवेल), उपजिल्हा रुग्णालय (पनवेल) हि सर्व कार्यलये पनवेलमध्येव आहेत. पनवेल हे उरण, कर्जत व पनवेल तालुक्यातील गावांसाठी जवळचे ठिकाण असून आमच्या या निवेदनाची आपण जाणीवपूर्वक दखल घेऊन जातपडताळणीचे अर्ज जमा करण्यासाठी पनवेलमध्ये कांउटर (खिडकी) उघडावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. 





थोडे नवीन जरा जुने