पनवेल(प्रतिनिधी) येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक हक्काचं व्यासपीठ वृत्तपत्राच्या आठव्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, मठाधिपती सुधाकर घरत, हक्काचं व्यासपीठचे संपादक अविनाश कोळी, खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेते संजय जैन, केदार भगत, पत्रकार संजय कदम, प्रशांत शेडगे, मयूर तांबडे, अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी म्हंटले कि, गेल्या २५ वर्षांपासून अविनाश कोळी हे पत्रकारिता क्षेत्रात ते अतिशय प्रभावीपणे काम करीत आहेत. जनतेच्या सरकारप्रति असलेल्या अपेक्षा सरकारकडे पोहोचविणे आणि सरकारचे कार्य काय सुरु आहे हे जनतेपर्यंत पोहोचविणे काम सातत्याने करताना ते दिसत असतात. यंदाचा त्यांचा अंक त्यांनी त्यासाठी समर्पित केला असून योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी तपशिलवार माहिती या अंकात नमूद केली आहे. सुंदर असा हा अंक झाला असून योजनांच्या अनुषंगाने जनता आणि सरकार यामधील हा अंक महत्वाचा दुवा म्हणून नागरिक प्राधान्याने वापर करू शकतात, असेहि परेश ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित करून दिवाळी अंकाला शुभेच्छा दिल्या.
मागील वर्षी कोरोनाचे संकट होते त्या अनुषंगाने आरोग्य विषयक अंक प्रकशित करण्यात आला होता. या वर्षी आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. देशाचे सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे आणि त्या योजना लोकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी या वर्षीचा अंक योजना विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. अनुषंगाने यंदाच्या वर्षी योजनांवर आधारित दिवाळी अंक प्रसिद्ध केला, असल्याचे संपादक अविनाश कोळी यांनी नमूद केले. हक्काचं व्यासपीठ दिवाळी अंकात सर्वसामान्यांसाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली असून या अंकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे या अंकाला वाचकांचा प्रतिसाद लाभत आहे
Tags
पनवेल