पनवेल दि . २१ ( संजय कदम ) : तालुक्यातील पाडेघर गाव परिसरात बसचा टायर फुटल्याने बस उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर बस मधील डीझेलची चोरी केल्याची घटना घडली आहे .
बस चालक प्रमोद धावारे याने त्याच्या ताब्यातील बसचा टायर फुटल्याने सदर बस पाडेघर गाव परिसरात उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर बसच्या डीझेल भरण्याच्या टाकीचे लॉक तोडून आतील २०० लिटर डीझेल ज्याची किंमत जवळपास १८ हजार रुपये इतकी आहे ते चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Tags
पनवेल