पनवेल येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक हक्काचं व्यासपीठ वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, मठाधिपती सुधाकर घरत, हक्काचं व्यासपीठचे संपादक अविनाश कोळी, खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेते संजय जैन, केदार भगत, पत्रकार संजय कदम, प्रशांत शेडगे, मयूर तांबडे, अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते. हक्काचं व्यासपीठ दिवाळी अंकात सर्वसामान्यांसाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली असून या अंकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे या अंकाला वाचकांचा प्रतिसाद लाभत आहे.
Tags
पनवेल