पनवेल दि.१५ (वार्ताहर) : सिडको वसाहतीमध्ये मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्यांचे निर्बीजीकरण होत नसल्याचे सहाजिकच गंभीर परिस्थिती उद्भवली आहेत. कळंबोली वसाहतीत एकाच कुत्र्याने सहा जणांना चावा चावल्याची घटना घडली आहे.
कळंबोली वसाहतीत सेक्टर 14 येथे एकाच कुत्र्याने एकाच वेळी सहा जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. संबंधितांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना तेथेच रेबिज देण्यात आले. पोदी येथे सिडकोचे निर्बिजीकरण केंद्र सध्या पनवेल मनपा चालवत आहे. दरम्यान महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भटके आणि मोकाट कुत्रे रस्त्यावर फिरताना आढळतात. रात्रीच्या वेळी तर ते मोटर सायकल च्या पाठीमागे धावतात. त्यामुळे काही मोटर सायकल स्वार गाडीवरून पडल्याचा ही घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर स्वान दंशाचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. सिडको वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जास्त प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात नाही. परिणामी दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याला आळा घालणे महापालिकेच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. त्याचबरोबर या मोकाट कुत्र्यांच्या उच्छादावर नियंत्रण घालता येत नाही. भटक्या कुत्र्यांना आवरण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कळंबोली सिडको वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.
त्यांच्यामुळे एक प्रकारे दहशत निर्माण झाली आहे. श्वानदंशाचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यांनी सुरू केलेला हा उच्छाद थांबवण्याचा दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी मनपाला पत्र दिले आहे.