रामप्रहर’ने दिवाळी अंकांची परंपरा जपली -लोकनेते रामशेठ ठाकूर


 

पनवेल(प्रतिनिधी) दै. रामप्रहरच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतो. अगदी कोरोना काळातही त्यात खंड पडला नाही. ‘रामप्रहर’ने दिवाळी अंकांची परंपरा जपली असून यंदा पर्यटनावर आधारित अंक प्रसिद्ध करून या अंकातून वाचकांना पर्यटनाची पर्वणी दिली आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. २२) येथे काढले.


‘रामप्रहर’च्या पर्यटन विशेष भटकंती दिवाळी अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
प्रकाशन समारंभास ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, वृत्त संपादक समाधान पाटील, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, संजय कदम, भाजप नेते गजानन पाटील, प्रकाश पाटील, मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, आर्टिस्ट सुबोध ठाकूर, पंकज डावलेकर आदी उपस्थित होते.
‘रामप्रहर’ने दिवाळी अंकात निसर्ग आणि प्रवासवर्णन यांची चांगली सांगड घातली आहे. मुखपृष्ठही सुंदर आहे. या अंकात रायगडसह महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील पर्यटनावर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्र यांचाही समावेश आहे. त्यामुळे हा सर्वांगसुंदर अंक सर्वांना आवडेल अशी खात्री वाटते, असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले.
दिवाळी अंकातील माणुसकी या कवितेचा संदर्भ देत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आवश्यक असतो. त्याचबरोबर माणुसकीही महत्त्वाची आहे.


आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही ‘रामप्रहर’च्या अंकाचे कौतुक करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
‘रामप्रहर’ दिवाळी अंकास व्यवस्थापक दादाराम मिसाळ, उपसंपादक वसंत ठाकूर, तन्वी गायकवाड, सायली रावले, लेखापाल उद्धव घरत, वितरक महेश काळे, मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, शशिकांत बारसिंग, प्रवीण गायकर, मुद्रित शोधक दिलीप रेडकर, किल्लेप्रेमी पैगंबर शेख, छायाचित्रकार सुधीर नाझरे, कार्यालयीन सहाय्यक सुरज पाटील, किरण वाहुळकर यांचेही सहकार्य लाभले.



Attachments area

थोडे नवीन जरा जुने