पनवेल दि.०७ (वार्ताहर) : कळंबोली येथून आपल्या राहत्या घरातुन एक विवाहित महिला कोणास काही एक न सांगता घरातुन निघुन गेल्याने या बाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे
राजश्री लखन पवार (वय २२ वर्षे) असे या बेपत्ता विवाहित महिलेचे नाव असून ती आपल्या एलआयजी-२, रुम नं.सी/७ भारत गॅस जवळ, सेक्टर १, कळंबोली, पनवेल येथील आपल्या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता घरातुन निघुन गेली आहे.
सदर महिलेची उंची अंदाजे ४ फुट ४ इंच, डोळे काळे, रंग सावळा अंगाने मजबूत, चेहरा गोल, केस काळे व मोकळे सोडलेले, नाक सरल, अंगामध्ये पंजाचा आणि काळया रंगाची लेगोज डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत लखन नाम आहे.
सदर महिलेला मराठी व हिन्दी भाषा बोलता येत असून या महिलेबाबत कोणास काही माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाण्यात किंवा पोना किशोर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
कळंबोली