पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) : खारघर सेक्टर ३५ येथील तळोजा रोड येथे रस्त्याच्या मधोमध एक मोठा साप थांबल्याची माहिती नागरिकांनी पुनर्वसु फाउंडेशन संस्थेला दिली. सर्पमित्र शारोन सोनावणे आणि त्यांचे सहकारी विशाल असूळकर, हर्ष गायकवाड, सुदेश गायकवाड त्वरित घटना स्थळी पोहचले.
सापाची पाहणी केल्यावर भारतीय अजगर जातीचा सुमारे दहा फूट लांबीचा मोठा साप असल्याचे लक्षात आले. सर्पमित्र शारोन यांनी बचाव कार्य सुरू केले. नेटवर्क शारोन आणि सुदेश यांनी अजगराला सुखरूपरित्या ताब्यात घेतले. तसेच वनविभागास कळवून सुरक्षितरित्या जंगलात सोडले.
Tags
पनवेल