चिल्ड्रन टेक सेंटर आणि शाहू इन्स्टिट्यूट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात रोबोटिक सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर,
उपायुक्त सचिन पवार, माजी नगरसेवक अनिल भगत, शाहू इन्स्टिट्यूटचे प्रमुख जयंत भगत प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्यावतीने रोबोटिक संदर्भात विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
Tags
पनवेल