पनवेल (हरेश साठे ) प्रथा आणि परंपरेने सर्व समाजाची सातत्याने निस्वार्थीपणे सेवा करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर त्यांचे सहकारी आणि पक्ष करीत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज खांदा कॉलनी येथे केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
या अंतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवार, दि. १६ ऑक्टोबर) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात १३ वे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर संपन्न झाले. या महाशिबिराचे उदघाटन नामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी नामदार रवींद्र चव्हाण बोलत होते.
या महाशिबिरास प्रमुख मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, डॉ. समीर सहस्त्रबुद्धे, तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, युवा नेते विनोद साबळे, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदेश पाथरे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, खारघर भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, संदीप पाटील, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, विजय चिपळेकर, राजू सोनी, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, अमर पाटील, मुकीत काझी, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका सुशीला घरत, दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, नीता माळी, कुसुम म्हात्रे, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, कल्पना ठाकूर, हेमलता म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर , तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, शशिकांत शेळके, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव मन्सूर पटेल, डॉ. संतोष आगलावे, डॉ. कृष्णा देसाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नामदार रवींद्र चव्हाण यांनी पुढे बोलताना सांगितले कि, गेली अनेक वर्षे पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची सेवा सातत्याने भव्य अशा या महाआरोग्य शिबिरातून केली जात आहे. हजारो रुग्ण या महाशिबिराचा लाभ घेत असतात. सर्वच प्रकारच्या आजारावर या ठिकाणी उपचार आणि औषधोपचार केले जात आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूर व्यक्तिमत्व आहेत, येथील नागरिकांना काय हवे आहे, याची जाणीव ठेवत सामाजिक बांधिलकीने त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य केले जात आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून सरकार आले त्यापासून गरीब मध्यमवर्गीय नागरिकांना आरोग्य व्यवस्था देण्याचे काम होत आहे. त्या अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेचा लाभ करोडो नागरिक घेत आहेत, त्याच जोडीने राज्यात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना आणि इतर सुविधा उपलब्ध करून देत आयुष्याला या योजनेतून मदत देण्याचे काम होत आहे. या भव्य महाशिबिरात फक्त सर्वसाधारण रोगांवर नाही तर कॅन्सर, हृदयविकार, नेत्र तपासणी, महिला व लहान मुलांचे आजार, दिव्यांगांना व्हीलचेअर, हात किंवा पाय नसलेल्यांना जयपूर फूट असे विविध आरोग्यदायी सेवा होत असून नागरिकांना हि सेवा संपूर्ण मोफत देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यामुळे हे फक्त महाशिबीर नसून सेवेचा अखंड महायज्ञ आहे, असेही नामदार रवींद्र चव्हाण यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी महाशिबिराची पाहणी करून आढावा घेतला आणि अत्यंत उत्कृष्ट नियोजन असल्याची पोचपावती यावेळी दिली. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या महाशिबिराचा १०५०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. त्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार देण्याबरोबरच त्यांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. त्यासाठी शेकडो स्वयंसेवक तसेच कार्यकर्ते सज्ज होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, दरवर्षी भव्य स्वरूपात हे महाशिबीर होत असते. किमान १० हजार नागरिक या शिबिराचा लाभ घेत असतात. या शिबिरात विशेष म्हणजे असाध्य आजारांवही उपचार केले जाते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विविध रुग्णालयांचे डॉक्टर व त्यांचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, समाजसेवक मेहनत घेत असतात, त्यामुळे त्यांच्याप्रती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणातून आदर व्यक्त केला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ माझ्या नावाने स्थापन झाले आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा अखंडपणे केली जात आहे, याचा आपल्याला आनंद आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे रायगड जिल्ह्यावर प्रेम आहे, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्या जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले.
या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, महिलांचे आजार, हृदयरोग, हाडांचे रोग, मधुमेह, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, बालरो ग, त्वचा व गुप्तरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक-कान-घसा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, ईसीजी तपासणी, कॅन्सर तपासणी, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात आले. त्याचबरोबर ० ते १८ वयोगटापर्यंत २डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया, डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र, देण्याबरोबरच मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूट बसविण्याचे शिबीरही झाले.
यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड सुद्धा या शिबिरात तयार करून देण्यात आले. तसेच हृदय विकाराच्या झटक्यावर प्राथमिक उपचार करण्यासंदर्भात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनही