संदीप तुपे यांची यांची पक्षातून निलंबित, पक्षाची बदनामी आणि गैरवर्तन केले म्हणून पक्षाने कारवाई कारवाई.



पनवेल(प्रतिनिधी)   कामोठे येथील शक्ती केंद्र प्रमुख संदिप तुपे यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांकरिता निलंबन करण्यात आले आहे.  पक्षाची बदनामी होईल, असे वर्तन करत असल्याबद्दल पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली.


        संदीप तुपे हे आपल्या वर्तनातून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत असल्याच्या तक्रारी वारंवार पक्षाकडे येत आहेत, त्या अनुषंगाने या संदर्भात वारंवार समज दिली तसेच त्याबतचे लेखी पत्रही तुपे यांना जिल्हा भाजपच्यावतीने देण्यात आले होते. तरी सुद्धा संदीप तुपे यांच्या वर्तनात बदल झाला नाही, उलट तक्रारीमध्ये अधिक वाढ होत चालली असल्याने अखेर पक्षाची बदनामी थांबवण्याकरिता संदिप तुपे यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांकरिता निलंबन करण्यात आले आहे. 


संदीप तुपे हे पनवेल महानगरपालिकेच्या  कामोठे मधील माजी नगरसेविका संतोषी तुपे यांचे पती आहेत त्यामुळे त्यांनी पक्षाचे नाव खराब होईल  असे कृत्य करू नये अशी अपेक्षा होती त्या बद्दल पक्ष श्रेष्ठींनी त्यांना वरवर सूचना देऊनही त्यांचात काही बदल घडला नाही म्हणून पक्षाने त्यांच्यावर 6 वर्षासाठी निलंबनाची करवाई केली.


थोडे नवीन जरा जुने