सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना प्रशंसनीय कामगिरीबद्दल आले गौरविण्यात

 

पनवेल दि १८ (संजय कदम) : विविध गुन्ह्यात केलेल्या प्रशंसनीय कामगिरी करिता सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना महाराष्ट्र पोलीस अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहरच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.


 

         12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबांकडे १.५ कोटीची खंडणी तसेच डबल मर्डर आणि तस्करी सारखे गुन्हे दाखल असणारे गुजरातचे आरोपी, १०० पेक्षा जास्त पोलिसांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न करून नाशिक, पालघर, ठाणे, सूरत, अहमदाबाद जिल्ह्यात तपास करून आरोपींना मानपाडा पोलीस ठाण्याच्या सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांनी बेड्या ठोकल्या होत्या या गुन्ह्या संदर्भात केलेल्या प्रशंसनीय कामगिरी व तपासा



 करिता पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. भविष्यात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकलं अश्या शुभेच्छा वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिल्या आहेत. 


 

थोडे नवीन जरा जुने