पनवेल दि १८, (संजय कदम ): अज्ञात कारणावरून एका इसमाची धारदार हत्याराने मानेवर गळ्यावर वार करून व तोंडावर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना नवीन पनवेल सेक्टर १८ विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या पाठीमागे घडली आहे.
फारुक फकीर अहमद ब्यापारी (वय २२) रा. पोदी नंबर २ नवीन पनवेल हा मजूरी काम करत होता त्याची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने मानेवर गळ्यावर वार करून व तोंडावर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहिती नुसार व गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार काही संशयितांचा शोध खांदेश्वर पोलीस करत आहेत.
Tags
पनवेल