वृध्दाची ९४ हजारांना ऑनलाईन फसवणूक



पनवेल दि १८ (वार्ताहर )

घराच्या लाईटचे बिल अपडेट न झाल्याने घराची लाईट कापली जाणार असल्याची भिती दाखवून सायबर चोरट्याने कामोठे, सेक्टर- ३५ मध्ये राहणाऱ्या एका वृध्दाला मोबाईलवर क्विक सपोर्ट अँप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या खात्यातून ९४ हजाराची रक्कम परस्पर लांबवल्याची घटना घडली आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्या विरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.




              सदर प्रकरणातील तक्रारदार हरिपालसिंग बिश्ता (६६) कामोठे, सेक्टर- ३५ मध्ये राहण्यास असून ११ नोव्हेंबर रोजी ते रात्री ९.३० च्या सुमारास घरी असताना त्यांच्या मोबाईल फोनवर अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवून त्यांच्या घराची लाईट कट होणार असल्याचे तसेच लाईट कट होण्याच्या आत बिल भरण्यास किंवा त्यामध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करण्यास सांगितले. त्यामुळे हरिपाल सिंग यांनी तत्काळ मेसेजमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला असता समोरील व्यक्तीने कामोठे, सेक्टर-१७ मधील 'महावितरण'च्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून त्यांचे लाईट बिल भरले नसल्याचे सांगितले.



 मात्र, हरपाल सिंग यांनी लाईट बिल भरल्याचे सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तीने त्यांनी भरलेले बिल अपडेट झाले नसल्याचे सांगून त्यांचे बिल अपडेट करण्यासाठी त्यांना त्यांच्या अकाऊंटवरुन १० रुपये पेमेंट करण्यास सांगितले. तसेच पैसे पाठविण्यासाठी त्यांना मोबाईलवर क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार हरपालसिंग यांनी अॅप डाऊनलोड करुन त्यावरुन सायबर चोरट्याला १० रुपये पाठवून दिले. त्यानंतर हरपाल सिंग सायबर चोरट्या सोबत फोनवर बोलत असतानाच सायबर चोरट्याने हरपालसिंग यांच्या दोन्ही बँक खात्यातून ९४ हजार रुपयांची रक्कम काढली.



थोडे नवीन जरा जुने