महाड आणि माणगाव या दोन तालुक्याला जोडणारा काळ जलविद्युत प्रकल्प गेली कित्येक वर्ष धूळ खात पडला आहे. ज्या ठिकाणी हा प्रकल्प होतआहे तेथील सुमारे 80 टक्के काम होऊन देखील पुनर्वसनाचे काम सुरु करण्यात आले नाही. आधी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा मगच धरणाचे काम सुरुकरा, असा इशारा स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांनी दिला आहे. जलसंपदा विभागाची परवानगी नसताना याठिकाणी ठेकेदाराकडून बेकायदेशीर काम सुरुअसल्याचा आरोप संघर्ष समितीने आणि प्रकल्पग्रास्तानी केला आणि धरणाचे काम रोखले आहे
. छत्रीनिजामपूर या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अत्यंतमहत्त्वाची असलेला काळ जलविद्युत प्रकल्पातील धरण होत आहे. या भव्य प्रकल्पातील धरणाचे काम सुमारे 80 टक्के झाले आहे. केवळ घळ भरणीचेकाम बाकी आहे. बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणात रायगडमधील धरण प्रकल्पांची कामे रखडली. चौकशीचा फेरा अद्याप संपला नसल्याने छ. निजामपुरमधील धरण प्रकल्प असाच रखडला आहे. या प्रकल्पात किल्ले रायगड परीसारतील छ. निजामपूर, बावळे, सांदोशी हि गावे बाधित होत आहेत. यामध्ये1862 घरांचा समावेश असून यांचे पुनर्वसन देखील अपूर्ण अवस्थेत खितपत पडले आहे. शासनाने सांदोशी, आमडोशी मधील 242 घरांचे पुनर्वसन आढाव गावात निजामपूरमधील 176 घरांचे रायगडवाडी परडी येथे तर वाघेरी येथे 198 घरांचे, माणगाव मधील नानोरे येथे 374 घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागापाहिल्या आहेत.
या पुनर्वसन जागेत देखील अद्याप कांहीच हालचाल झालेली नाही. येथील प्रकल्पग्रस्तांना केवळ जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे.तो देखील अतिशय कमी दराने. प्रकल्प मंजूर होताच येथील विकासकामाच्या निधीवर शासनाने टाच आणली. गेली अनेक वर्ष याठिकाणी विकास निधीचदिला जात नाही. यामुळे ना प्रकल्प पूर्ण होत ना पुनर्वसन, ना विकास अशा विचित्र अवस्थेमध्ये येथील प्रकल्पग्रस्त सापडले आहेत.काळ जलविद्युत प्रकल्प हा या परिसरातील आणि महाडच्या नागरिकांसाठी विकासाचा सेतूच आहे.
या प्रकल्पामुळे महाड ते कोंझर, वारंगी ते बिरवाडीपर्यंतचा भाग पाण्याने सुपिक होणार आहे. या परीसरातील काळ, सावित्री, गांधारी या तिन्ही नद्या यामुळे कायम पाण्याने भरलेल्या दिसतील. या पाण्यावरशेती आणि शेती आधारित उद्योगांना चालना मिळणार आहे. मात्र शासनाचे काम आणि वर्षभर थांब अशी अवस्था या प्रकल्पाबाबत झाली आहे. कोणताचनिर्णय शासन घेत नसल्याने प्रकल्पग्रस्त बेहाल झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे प्रकल्पग्रस्त शासन दरबारी गेली 15 वर्ष खेटे मारून थकलेआहेत. नव्या शासनाकडून यांना आशा होत्या त्या देखील आता मावळल्याने प्रकल्पग्रस्तानी आता हा प्रकल्पच रद्ध करा अशी मागणी केली होती. याबाबतसातत्याने मुख्यमंत्री, जलसंपदा विभागाचे मंत्री, पालकमंत्री आदींच्या भेटी घेवून झाल्या आहेत. सरकारे बदलली मात्र निर्णयात बदल न झाला नाही यामुळेप्रकल्पग्रस्त संतापले आहेत.
बावळे गावातील मुल्यांकन सन 2012-13 प्रमाणे करावे, घरांच्या सभोवताली असलेले फळ झाडांचे मुल्यांकन देखील सन 2012-13 प्रमाणेच करावे,सांदोशी येथील 52 घरांच्या किमंत झिरो आलेल्या आहेत व त्या घरांचे मुल्यांकन करण्यात आलेले नाही त्यांचेही मुल्यांकन करण्यात यावे अशा विविधमागण्या वारंवार करण्यात आल्या आहेत. सन 2022 मध्ये संबंधित ठेकेदाराने काम सुरु करतोय असे स्थानिक ग्रामस्थांना भासवण्यासाठी हालचालीसुरुकेल्या. कांही प्रमाणात कामे सुरु देखील केली मात्र जलसंपदा विभागाने पुढील आदेश प्राप्त झाल्याशिवाय याठिकाणी कोणत्याच प्रकारची कामे सुरु केलीजावू नयेत अशा प्रकारच्या लेखी सूचना दिल्या आहेत. मात्र तरी देखील येथे काम सुरु करण्यात आले. पावसाळ्यानंतर पुन्हा हे काम सुरु करण्यात आले.
Tags
महाड