उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू टाइम्स गौरव पुरस्काराने सन्मानित.


उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील डॅशिंग पत्रकार व उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी दैनिक रायगड टाइम्स, रत्नागिरी टाइम्स व गोवा टाइम्स यांच्या रौप्य महोत्सव दिनाचे औचित्य साधत संपादक उल्हास पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबद्दल घन:श्याम कडू यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
     घन:श्याम कडू हे गेली अनेकवर्षं पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांनी आपली लेखणी चालविताना कोणाचीही भीडभाड न ठेवता सडेतोड चालविली आहे. त्यांच्या लेखणीमुळेच त्यांना दैनिक रायगड टाइम्स, रत्नागिरी टाईम्स व गोवा टाईम्सच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधत जिल्ह्यातील पत्रकारांना टाइम्स गौरव पुरस्काराने सन्मान निर्भिड पत्रकारितेचा पुरस्कार जाहीर झाला होता.
संपादक उल्हास घोसाळकर यांच्या शुभहस्ते रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी अलिबाग येथील कार्यक्रमात उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना टाइम्स गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी इमेज कॅलेंडर २०२३ ची जिल्हास्तरीय छायाचित्रे स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत जेष्ठ पत्रकार घन:श्याम कडू यांच्या छायाचित्राला द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात आले होते.पत्रकारिता करताना पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्यावर त्यांनी नेहमी आवाज उठविला. केवळ पत्रकारच नव्हे तर समाजातील वंचित, दुर्लक्षित, शेतकरी, कष्टकरी, मजूर, प्रकल्पग्रस्त आदि घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी. या दृष्टीकोनातून समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.अशा समाजसेवी व्यक्तिमत्व असलेल्या उरण मधील जेष्ठ पत्रकार असलेले घनश्याम कडू यांना पुरस्कार मिळाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


थोडे नवीन जरा जुने