उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )राष्ट्रीय स्तरावर 2014 पासून तरुण आणि गरजूंच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या नॅशनल प्रोग्रेसिव्ह युथ असोसिएशन तर्फे सभासद सतीश विष्णू गावंड यांना त्यांच्या कार्याचे योगदान लक्षात घेता त्यांची अधिकृतपणे कार्याध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले आहे . नियुक्ती पत्र देताना संस्थेचे उपाध्यक्ष रोहिदास शेडगे,खजिनदार विलास शिवकर आणि संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परेश पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते
.सतीश गावंड यांनी पत्र स्वीकारताना संस्था बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच संस्थेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करेन. तसेच माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन व गोरगरिबांना आणि समाजातील गरजू व्यक्तींना संस्थेच्या वतीने सर्वत्तोपरी मदत करेन असे आश्वासन दिले.सतीश गावंड हे पिरकोनचे रहिवाशी असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तळागाळातील सर्वांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांची निवड कार्याध्यक्ष पदी करण्यात आल्याचे समजते.नॅशनल प्रोग्रेसिव्ह युथ असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी सतीश गावंड यांची निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Tags
उरण