शेखर पाटील हे युवा मोर्चाचे पदाधिकारी असतानाही मात्र त्यांनी पक्षाची जबाबदारी पार न पाडता सतत पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्याचबरोबर पक्षाला कोणतीही सुचना न देता बोकडवीरा ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापक्षासोबत परस्पर युती घालण्याचा घाट घातला.
त्यामुळे विरोधी पक्षाला शेखर पाटील यांनी उघडपणे सहकार्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम त्यांनी करत त्या विभागात पक्षाचे खच्चीकरण करण्याचे जाणूनबुजून काम केले. या संदर्भात वारंवार समज देऊनही शेखर पाटील यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर व युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी शेखर पाटील यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करून पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Tags
पनवेल