'भगवान बिरसा मुंडा चषक २०२२' या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान गाढेश्वर मंदिर येथील भव्य मैदानात रंगणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेश भालेकर, दुदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर पाटील, वाजे ग्रामपंचायतीचे सदस्य पद्माकर वाघ, मालडुंगे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन निरगुडा, दुदरे माजी उपसरपंच शांताराम चौधरी, भाजप जेष्ठ कार्यकर्ते विष्णू चौधरी, युवा कार्यकर्ते विकास भगत, गणेश पाटील, दिलीप पाटील, शत्रुघ्न उसाटकर यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
Tags
पनवेल