अडगळीत पडलेले पुस्तक होणार वाचनीय



संकल्प फाउंडेशन चा पुढाकार
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी खास पुस्तकालय
पनवेल दि . १९ ( वार्ताहर ) :   वाचाल तर वाचाल अशा प्रकारचे एक घोषवाक्य आहे. आणि ते खरोखर वास्तववादी आहे.वाचनामुळे माणूस शहाणा आणि प्रगल्भ बनतो त्याचबरोबर त्याला ज्ञानाचे दरवाजे खुले होतात. या पार्श्वभूमीवर संकल्प फाउंडेशनच्या वतीने पुस्तकालय सुरू करण्यात येत आहे. यामध्ये अडगळीत पडलेले त्याचबरोबर आपल्याला नको असणारे पुस्तक जमा करता येऊ शकतात. जेणेकरून ते इतरांना वाचनीय ठरतील अशा प्रकारचे आवाहन संस्थेच्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी केले आहे.


                          पुस्तक हे जरी जमिनीवर असले तरी त्याचे वाचन करून अभ्यास करणारा हा गगन भरारी घेतो. त्याच्या ज्ञानामध्ये कमालीची भर पडते. त्याचबरोबर बौद्धिक क्षमता सुद्धा यामुळे वाढते. वैचारिक पातळीत  कमालीचा बदल होतो. पुस्तकासारखा दुसरा गुरु नसल्याचे विचारवंत सांगतात.


 अनेक पुस्तकांनी कित्येक जणांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवलेत. पुस्तकांमधील विचार आणि तत्त्वज्ञानाने अनेक विचारवंत आणि तत्त्वज्ञ घडवल्याचे उदाहरणे आहेत. वाचनातूनच बहुसंख्य उच्चपदस्थ अधिकारी घडले. क्रांतिकारक, समाज सुधारक सुद्धा वाचनातूनच निर्माण झाले. एकंदरीतच पुस्तकांमध्ये प्रचंड अशी ताकत आणि जादू आहे. त् मात्र अलीकडच्या काळामध्ये मोबाईल, समाज माध्यम तसेच धावपळीमुळे वाचनासाठी वेळ मिळत नाही.


 नवीन पिढी वाचनाकडे एक प्रकारे पाठ फिरवत आहे. त्यामुळे संस्कारक्षम पिढी घडवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुला मुलींबरोबरच पालक सुद्धा वाचनाची आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने काही सामाजिक संस्था काम करीत आहेत. त्यामध्ये पनवेल परिसरातील शालेय पाठ्यपुस्तकांची बुक बँक बनवणाऱ्या संकल्प फाउंडेशन ने सुद्धा आग्रही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी संकल्प पुस्तकालय सुरू केले आहे. आपल्या घरामध्ये अडगळीत पडलेले त्याचबरोबर रद्दीत काढलेली पुस्तके या पुस्तकालयात जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जेणेकरून त्याचा वापर इतर वाचक करू शकतील त्यातून त्यांना ज्ञान आणि उपयुक्त माहिती प्राप्त होऊ शकते यामुळे आपण एक चांगला समाज घडवू शकू
अशा प्रकारचे मत संकल्प फाउंडेशन च्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.






थोडे नवीन जरा जुने