कर्नाळा अभयारण्याचा बोधचिन्हाचे झाले नुकतेच अनावरण




तिबोटी खंड्या अभयारण्याचा ब्रँड अँबेसिडर
पनवेल दि . १९ ( वार्ताहर  ) :  पनवेल जवळील कर्नाळा पक्षी अभयारण्याचा लोगो तयार करण्यात आला आहे. स्पर्धात्मक पद्धतीनं निर्माण करण्यात आलेल्या या बोधचिन्हाचे नुकतेच अनावरण झाले. रायगडचा पक्ष म्हणून जाहीर झालेल्या तिबोटी खंड्याचे मनमोहक चित्र त्यावर असल्याने पक्षप्रेमी आणि पर्यटकांना खऱ्या अर्थाने अभयारण्याचा बोध होणार आहे.


                     मुंबईपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठया प्रमाणात पर्यटक येतात.लोणावळयाप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय, रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन,सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा,बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सुर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे 134 प्रजातीचे स्थानिक तर 38 प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत.


अभयारण्य परिसरात ओरीटयल टोग किंगफिशर अत्यंत आकर्षित असा स्थलांतरित पक्षी बाहेरील  देशातून येतो. त्याला तिबोटी खंडया असेही म्हटले जाते. साधारणता मे महिन्याच्या शेवटी हा पक्षी या परिसरात येतो. आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा परततो.श्रीलंक,मलेशिया, इंडोनेशिया मार्गे हा पक्षी भारतात येतो विशेषता कर्नाळा अभयारण्यामध्ये तो पावसाळ्यामध्ये राहतो. तिबोटी खंड्याला रायगडच्या पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. 


एकंदरीतच कर्नाळा अभयारण्यात येणारे पक्ष प्रेमी आणि पर्यटकांची संख्या वाढावी या अनुषंगाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. अभयारण्याची ओळख आणि येथील पक्षांचा बोध व्हावा या उद्देशाने बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संकेत मोरे या चित्रकाराच्या लोगोला प्रथम पसंती देण्यात आली. हेच बोधचिन्ह आता कर्नाळा पक्षी अभयारण्याची ओळख असणार आहे. या बोधचिन्हांचे अनावरण अभयारण्यात पार पडले. यावेळी उपवनसंरक्षक वन्यजीव ठाणे सरोज गवस, सहाय्यक वनसंरक्षक फणसाड  नंदकिशोर कूप्ते,ए.ए.चव्हाण मानद वन्यजीव रक्षक ,  कृपा पाटील, पर्यावरण तज्ज्ञ  वर्षा रेड्डी,तांत्रिक सल्लागार व वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य एन.डी राठोड आणि रेंज स्टाफ तसेच वन परिक्षेत्र अधिकारी फणसाड अभयारण्य  टी.पी.काळभोर यांच्या सह कर्मचारी व  पर्यटक  उपस्थितीत होते

थोडे नवीन जरा जुने