विद्या तामखेडे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराणे 2023 ने सन्मानित..







मुंबई दि. 28 जानेवारी (4K News) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवा संघ मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा  अहिल्यादेवी होळकर पुरस्कार कामोठे येथील समाजसेविका व भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त मोर्चा च्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ विद्या तामखेडे यांना त्यांच्या  सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला गेला.






यावेळी उपस्थित भाजपा प्रवक्ते गणेश जी हाके, आयकर आयुक्त नितीन जी वाघमोडे, मा. मनपा मुंबई उपायुक्त लक्ष्मण जी व्हटकर, वरिष्ठ अधिक्षक (पोस्ट टेलिग्राम) पांडुरंग जी चोरमले, सह आयुक्त मनपा मुंबई शरद जी उघडे, सह आयुक्त मनपा मुंबई विश्वास  जी मोटे, डॉ. तुषार बंडगर (HOD, KEM हॉस्पिटल)  मा. शिक्षण अधिकारी प्रकाश जी चरहाटे, धनगर माजा संपादक धनंजय जी तानले, कुर्ला नागरी सह.बँक संचालक शामराव जी अलदर आणि सर्व मान्यवर उपस्थित होते


या वेळी बोलताना सौ विद्या तामखेडे म्हणाल्या "अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य अजोड त्यांच्या मूल्यांवर चालण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माझ्यासाठी अनमोल ठेवा असून रस्त्यातील मैलाचा दगड ठरणार आहे. 




माझ्या सामाजिक क्षेत्रातील कार्यात मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करून माझा हा पुरस्कार मी समाजातील वंचित घटकांच्या वतीने सन्मानपूर्वक आज स्वीकारत आहे.



 पुरस्कार देऊन माझ्या पाठीवर समाजाने शाबासकी ची थाप दिली आहे ही शाबासकी माझ्यासाठी भविष्याच्या वाटचालीस ऊर्जा देणारी तसेच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शक्ती प्रदान करणारी आहे"  .......



थोडे नवीन जरा जुने