देशाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. सन २०२३ मधील हा पहिला आणि एकूण ९७ वा भाग होता. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात थेट प्रक्षेपणाद्वारे या संवादाचा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,
शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, अमरीश मोकल, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाभ घेतला.
Tags
पनवेल