पनवेल(प्रतिनिधी) नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने गुरुवार दिनांक ०५ जानेवारी ते रविवारी ०८ जानेवारीपर्यंत 'आमदार चषक २०२३' टेनिस क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या नावडे फेज २ येथील सिडको मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तर बक्षिस वितरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास ०१ लाख रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्यास ५० हजार रुपये व चषक, तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी २५ हजार रुपये व आकर्षक चषक, त्याचबरोबर मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक प्रशांत खानावकर आणि सहकाऱ्यांनी केले आहे.
Tags
पनवेल