पनवेल दि.०५(वार्ताहर): पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एका प्रवाशाचा फोन पडला होता. यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसाला हा फोन सापडला असून त्यांनी तो ताब्यात घेतला.
वैभव मोहिते या तरुणाचा तो फोन होता. संबंधित तरुणाने फोनवर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी फोन त्याचाच असल्याची खात्री करून तो परत केला. याबाबदल वैभव मोहिते याने पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान नवी मुंबई, पनवेलमध्ये मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
पनवेल