पनवेल दि.०४ (वार्ताहर) : महावितरणच्या कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह खासगीकरणाविरोधात शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे पनवेल शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अशा परिस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता सरोदे यांच्याबरोबर फिरून वीजपुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडले.
महावितरण मधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे. यामुळे पनवेल शहरातील टिळक रोड, महात्मा फुले रोड, पायोनियर विभाग, मिडल क्लास सोसायटी इत्यादी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खंडित पुरवठा सुरळीत करण्यासाठी कुठलेही कर्मचारी जागेवर नव्हते अशा परिस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेनेचे महानगर प्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी कार्यकारी अभियंता सरोदे यांच्याशी पाठपुरावा सुरू केला.
त्यानंतर लगेचच सकाळपासून पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वात पनवेल मधील शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर इत्यादींनी ज्या भागात लाईट नाहीत त्या भागात कार्यकारी अभियंता सरोदे यांच्याबरोबर फिरून वीजपुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडले. कार्यकारी अभियंता असल्याने तांत्रिकदृष्ट्या ते सहभागी नाहीत परंतु उच्चपदस्थ व्यक्ती असूनही निव्वळ एका ड्रायव्हरच्या सहाय्याने पनवेल मधील अनेक भागात स्वतः फिरून त्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला आहे. त्यावेळेस प्रथमेश सोमण व त्यांचे प्रमुख सहकारी पदाधिकारी देखील फिरून त्यांना सहकार्य केले. पोलीस देखील सतर्क असून प्रमुख सबस्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. अजूनही काही भागात हा त्रास असेल परंतु आम्ही शक्य तिथे पाठपुरावा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत अशी प्रतिक्रिया सोमण यांनी दिली.
Tags
पनवेल