पनवेल दि.०४ (संजय कदम) : पनवेल परिसरात एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सदर इसमाचे अंदाज ५० ते ५५ वर्ष असून त्याचा बांधा मध्यम, रंग-सावळा, उंची ५ फुट, डोक्यास टक्कल, दाढी व मिशीचे केस पांढरे वाढलेले, चेहरा-उभट, नाक- बसके, अंगात नेसुन-निळया रंगाचा टिशर्ट व पॅन्ट परिधान केला आहे. सदर इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४६२३३३ किंवा सपोनि श्रीकांत शेडगे यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल