बेकायदेशीररीत्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई



पनवेल, दि.20 (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकाच्या समोरील पनवेल फुटपाथवर उघडयावर बेकायदेशीररित्या मानवी जीवास धोका उत्त्पन्न होईल अश्या पद्दतीने खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. 



 रजतकुमार रमेशचंद्र जेना हा पनवेल रेल्वे स्थानकाच्या समोरील पनवेल फुटपाथवर टेबल लावुन टेबलवर मानवी जिवीतास धोकादायक ठरेल अशा रितीने गॅस सिलेंडर पेटवुन अंडा भुर्जी विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याचेकडून ५०० रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीचा ५ किलो वजनाचा सिलेंडर व २०० रुपये किमतीची स्टिलची शेगडी असे एकूण ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



थोडे नवीन जरा जुने