नेरे येथून महिला बेपत्ता



पनवेल, दि.20 (वार्ताहर) : तालुक्यातील नेरे गाव येथून एक महिला कोणास काही एक न सांगता निघुन गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.



सदर महिलेचे नाव कुंदा राम धोंडगे असून वय ५४ वर्षे, उंची ५ फुट, अंगाने मजबूत, केस काळे पांढरे, डोळे काळे, मान जन्मापासून वाकडी आहे. तसेच अंगात साडी, डोक्याला रूमाल बांधलेला व पायात चप्पल असा पेहराव घातलेला आहे. सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२७४५२४४४ किंवा  पोलीस हवालदार एस. के. चिकणे यांच्याशी संपर्क साधावा. 



थोडे नवीन जरा जुने