बांधकामांवर सिडकोची कारवाई



सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांत नवी मुंबईसह पनवेल आणि नैना क्षेत्रातील जवळपास ४० बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. 
यात चार ते पाच मजल्यापर्यंतच्या अनधिकृत इमारतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सध्या कोणताही निवास नसलेल्या अनधिकृत इमारतीवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
थोडे नवीन जरा जुने