पनवेल दि.२७ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे युवानेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे संपन्न झाला. वाढदिवसानिमित केदार भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.
भारतीय जनता पार्टीचे युवानेते केदार भगत आपला वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवा साजरा करत असतात. यंदाही त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवामोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ,
युवामोर्चा शहराध्यक्ष रोहित जगताप, कोषाध्यक्ष देवांशु प्रभाळे यांच्यासह युवामोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने केदार भगत यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिखले येथील आदिवासी शाळेमध्ये ५४० विध्यार्थाना पोषक जेवणाचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ. गीतांजली केदार भगत, मित दसवंते, संकेत दसवंते, नितेश भगत, हर्षद गडगे, रवी परचे, सचिन जाचक, शेषनाथ गायकर, संतोष वर्तले, भावेश शिंदे, यज्ञेश पाटील, सार्थक भगत, ध्रुव भगत, योगेश साळवी, उज्वल पाटील तसेच केदार भगत मित्र परिवार उपस्थित होते.
Tags
पनवेल