कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सर यांना पनवेलमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण शिक्षकालाच आहे, त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रेसर निवडून येणे गरजेचे आहे, हे शिक्षक मतदारांना माहिती आहे, त्यामुळे आपला हक्काचा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी शिक्षक मतदारांची ज्ञानेश्वर म्हात्रेसरांना पसंती दिली.
त्यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत होते. यावेळी ते मतदानाचा आढावा घेत ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी बुथवर ठाण मांडून होते. आणि त्या अनुषंगाने जोरदार संपर्क करत म्हात्रेसरांना मतदान झाले. महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
Tags
पनवेल