खुटारीतील हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




पनवेल(प्रतिनिधी) माघी गणेशोत्सवानिमित्त खुटारी येथील 'हळदी कुंकू' समारंभात शेकडो महिलांनी सहभाग घेत या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
               खुटारी येथील श्री चैतन्यश्वर मंदिर येथे जय मातादी ग्रुपच्यावतीने स्व. जनार्दन म्हात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला 'हळदी कुंकू' समारंभ, व त्या अनुषंगाने खेळ पैठणीचा आणि विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. हळदी कुंकू निमित्त महिलांना वाण देण्यात आले.


 यावेळी झालेल्या 'खेळ पैठणीचा' कार्यक्रमात पैठणी साडी विजेता होण्याचा मान अश्विनी म्हात्रे तसेच लकी ड्रॉ स्पर्धेत ऋतुजा पाटील यांनी प्रथम तर रेखा म्हात्रे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजक माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, माजी सदस्य विलास म्हात्रे, तळोजा मध्यवर्ती कारागृह अशासकीय अभ्यागत मंडळ सदस्या लीना म्हात्रे, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा सविता म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी पूजा म्हात्रे, सुनीता म्हात्रे, वर्षा म्हात्रे, रितिका म्हात्रे, प्राची म्हात्रे, वैजयंता म्हात्रे, अवनी गायकर, भारती म्हात्रे, सारिका म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ आणि शेकडो महिला उपस्थित होत्या. 


थोडे नवीन जरा जुने