पनवेल : तालुक्यातील शिरढोण येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बाईक रॅली काढण्यात आली होती. गेल्या 21 वर्षांपासून गावामध्ये अष्टविनायक दर्शन ग्रुप च्या वतीने बाईक रॅली काढण्यात येते. यामध्ये शेकडो बाईकस्वार सहभागी होतात.
अष्टविनायक दर्शन ग्रुप चे अध्यक्ष दिलीप शंकर पवार यांनी व त्यांचे मित्र रूपेश मुकादम यांनी 2003 साली बाईकवरून अष्टविनायक दर्शन केले. यानंतर आता प्रत्येक वर्षी या रॅलीमध्ये हळूहळू शेकडो जण सहभागी होत अष्टविनायकाचे दर्शन घेतात. दरम्यान, 2017 साली या बाईक रॅलीमध्ये सर्वाधिक जवळपास 258 बाईकस्वारांनी सहभाग घेतला होता.
Tags
पनवेल