पनवेल दि. ०६ ( संजय कदम ) : "पोलीस रेजिंग" डे सप्ताह अंतर्गत आज पनवेल शहर पोलीस ठाणे येथे महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय त्रिं कादबाने यांनी मागर्दर्शन केले .
या बैठकीस मागर्दर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय त्रिं कादबाने यांनी सांगितले की ,पनवेल परिसरातील शाळेतील मुलांच्या सुरक्षतेबाबत प्रश्न सायबर गुन्हे, महिला वरील अत्याचार या संदर्भात सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगून अश्या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महिला दक्षता समिती ने सुद्धा लक्ष घालावे व ज्या ठिकाणी गरज पडेल तिथे पोलिसांची सुद्धा मदत घ्यावी असे आवाहन सुद्धा त्यानी केले . या बैठकीस महिला दक्षता समितीच्या 11 महिलासह मसपोनि मोनाली चौधरी, सहा पो उपनिरीक्षक संजय धारेराव व पो हवा गौतम भोईर आदी उपस्थित होते .
Tags
पनवेल