लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या भेटीला बुधवारी पनवेलला स्नेहमेळावा मान्यवरांची लाभणार उपस्थिती




पनवेल(प्रतिनिधी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे (एम. ए. बी. एड.) हे सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या भेटीकरिता येणार असून त्यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी १२. ३० वाजता पनवेलमधील विरुपाक्ष मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. 



  

  या मेळाव्यास प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती असणार आहे.  कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ते स्वत: शिक्षक असून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी धाव घेतलेली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. 



थोडे नवीन जरा जुने