पनवेल (प्रतिनिधी) छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था(सारथी), (नियोजन विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाची स्थायत संस्था) व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल),पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठा,कुणबी,कुणबी-मराठा,आणि मराठा-कुणबी समाजाच्या नाॅन-क्रिमिलेयर" गटाच्या युवांसाठी २० हजार रुपये शुल्क असलेला संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण नि:शुल्क देण्यात येणार आहे.
१८ ते ४५ वयाेगटातील गरजू व इच्छुक पात्रता धारक उमेदवारांनी Online अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जामधून निकषाच्या अधारे अर्जाची छाननी करुन व प्रथम येणाऱ्या निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. पात्र उमेदवारांची यादी website वर (www.mkcl.org/csmsdeep) याेग्यवेळी प्रसिद्ध करण्यांत येईल.सदर प्रशिक्षणाचा खर्च सारथी पुणे मार्फत करण्यांत येईल. १६ जानेवारी पासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून ०१ फेब्रुवारी हे प्रशिक्षण सुरु होणार आहे. सदरचे प्रशिक्षण नवीन पनवेल मध्ये शाहू इन्स्टिट्यूट या नामांकित संस्थेमध्ये मिळणार असून यासाठी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण शिक्षण पात्रता आहे. यामध्ये एकूण कोर्स असणार असून प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे. अधिक माहितीसाठी शाहू इन्स्टिट्यूट, नवीन पनवेल, प्रजापती आर्केड, प्लॉट नं. २२-२३, सेक्टर १५ए, रेल्वे स्टेशन समोर, संपर्क ९८७०९११९११, ९३२४२४२९३२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शाहू इन्स्टिट्यूटचे प्रमुख व एमकेसीएलचे कोकण विभागीय अध्यक्ष जयंत भगत यांनी केले आहे.
Tags
पनवेल