पनवेल दि.०७ (वार्ताहर) : कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पनवेल येथे महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटनेचे तसेच टी. डी. एफ च्या वतीने शिक्षक संवाद मेळावा घेण्यात आला होता.
या मेळाव्याला शिक्षक मतदार संघ पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत, आमदार बाळाराम पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांतध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. सी.घरत, महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सतीश पाटील, पुरोगामी शिक्षक आघाडीचे अध्यक्ष भानुदास तुरुकमाने, पनवेल महानगरपालिकेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, पनवेल तालुका शेकापचे चिटणीस नारायणशेठ घरत यांच्यासह शिक्षक वर्गासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
पनवेल