पनवेल दि.०९ (संजय कदम) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल परिसरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यामध्ये पनवेल तालुका बुरुड समाजाची बैठक, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमीत जाधव यांच्या मातोश्री सुनिता जाधव यांच्या शोकसभेचा कार्यक्रम तसेच पेण येथे स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक असा भरगच्च कार्यक्रमाचा सहभाग आहे.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका बुरुड समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पनवेल शहरांमध्ये व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या शेकडो बुरुड समाजाच्या विकासाकरिता पनवेल शहरांमध्ये बुरुड समाजभावनाची आवश्यक आहे . त्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडे लवकरच बुरुड समाजभावना साठी पाठपुरावा करण्याचा ठराव मांडण्यात आला. या बैठकीला अध्यक्ष विलास गायकवाड, सुधाकर नागे, राजेश खैरे, सचिन खैरे, किशोर खैरे, प्रदीप गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यांनतर महेश साळुंखे यांनी रायगड जिल्हा परिषद सदस्य अमीत जाधव यांच्या मातोश्री सुनिता जाधव यांच्या शोकसभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
यावेळी अमित जाधव यांचे वडील व आरपीआय आठवले गटाचे ज्येष्ठ नेते दिवंगत माजी नगरसेवक एम एस जाधव यांचे पनवेल शहरातील रस्त्याला नाव देण्यात यावे यासाठी सर्व आंबेडकरी चळवळी कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे असे मत महेश साळुंखे यांनी व्यक्त केले. तसेच पेण येथे स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी आगामी निवडणुकांविषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी पदाधिकारी विजय धोत्रे, अमित कांबळे इत्यादी उपस्थित होते. यादरम्यान पेण पांडापूर येथे सामाजिक कार्यकर्ते राजेश खुटले यांच्या भावाच्या मुलाचा वाढदिवसानिमित्त महेश साळुंखे यांनी उपस्थित राहून चिमुकल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
पनवेल