पनवेल: (संजय कदम) 03/02/23 पनवेलकरांचे स्वप्न असलेल्या आणि पनवेल शहराच्या मध्यभागी वाढत असलेल्या नियोजित
"रोटरी घनदाट जंगल" ची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचल्याचे दिसत आहे. कारण या उपक्रमाची दखल घेत रोटरी आंतरराष्ट्रीय TRF - CHAIR रो . IAN RISLEY यांनी या उपक्रमाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु भारतात आल्यानंतर तब्बेत बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांच्या बरोबरच येण्याचे आश्वासन दिलेल्या TRF - Trustee रो . डॉ. भरत पंड्या यांनी या उपक्रमाला भेट दिली.
या भेटीमध्ये त्यांनी स्वतः वृक्षारोपण केले आणि रोटरी इंटरनॅशनल चे TRF - CHAIR रो. Ian Risley यांच्या वतीने सुद्धा वृक्षारोपण केले .
वृक्षारोपणा नंतर
TRF - Trustee रो .डॉ . भरत पंड्या यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून उपस्थित रोटरी सदस्यांचे कौतुक केले .
तसेच उपक्रमाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन परत भविष्यात या उपक्रमाला भेट देण्याचे अश्वासन दिले .
या वृक्षारोपणाच्या वेळी Ditrict 3131 चे गव्हर्नर रो. डॉ. अनिल परमार हे सपत्नीक उपस्थित होते .
या संपूर्ण भेटीचे संयोजन रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल चे मार्गदर्शक डॉ .गिरीश गुणे यांनी केले होते .
या वेळी क्लबचे मार्गदर्शक डॉ . गिरीश गुणे , अध्यक्ष रो. लक्ष्मण पाटील , फर्स्ट लेडी पुष्पलता पाटील , रो. डॉ. संजिवनी गुणे, सचिव रो. अनिल ठकेकर , रो. सैतवडेकर , रो . डॉ. अमोद दिवेकर , रो . डॉ लक्ष्मण आवटे , रो. भगवान पाटील , रो. प्रकाश रानडे , रो .मेघा तांडेल , रो. अनिल खांडेकर , रो . विवेक वेलणकर , रो. संतोष घोडीनदे , रो. अतिष थोरात , रो. सचिन वेरणेकर यांनी हजेरी लावली .
Tags
पनवेल