पनवेल दि.२७ (संजय कदम) : आई इन्फ्रा प्रोजेक्ट या प्रसिद्ध बांधकाम कंपनीचे डायरेक्टर व शिक्षण क्षेत्रात अग्रेसर नाव असलेले नरसु पाटील यांच्या सुपुत्राचा विवाह नुकताच संपन्न झाला. त्याप्रित्यर्थ नवी मुंबई येथील द्रोणागिरी येथे रिसेप्शन आयोजित करण्यात आले असून या सोहळ्याला विविध राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह, मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार नवदाम्पत्याला शुभआशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने हा सोहळा पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
नरसु पाटील यांचे सुपुत्र ब्रम्हानंद याचा शुभविवाह नुकताच बेळगाव येथील गजानन दळवी यांच्या सुपुत्री सोनाली हिच्याशी संपन्न झाला. अत्यंत थाटामाटात झालेल्या या लग्नसोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मात्र लग्नात उपस्थित राहू न शकलेल्या मान्यवरांच्या आशीर्वादासाठी येत्या रविवारी २९ जानेवारी २०२३ रोजी सांयकाळी ५ ते १० दरम्यान प्लॉट नं २३, सेक्टर ५०, द्रोणागिरी, आई इन्फ्रा ऑफिस समोर रिसेप्शन सोहळा संपन्न होणार आहे. या नवदांपत्याला शुभाआशीर्वाद देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह, मानसी नाईक, पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी, तेजश्री प्रधान, मकरंद अनासपुरे,
भाऊ कदम, पौर्णिमा अहिरे, माया जाधव, प्रभाकर मोरे, जयवंत भालेकर, प्रिया बेर्डे, अनंता कारेकर, मेघा घाडगे, प्रणव रावराणे, शिवाली परब, विकास समुद्रे, शहाजी काळे, किशोरी अंबिये, अरुण कदम उमेश बने, नितीन बोराडे व हास्य कलाकार संजीवन म्हात्रे आदी मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु असून आकर्षक शामियाना उभारण्यात आला आहे. या सोहळ्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असून पनवेल-उरण परिसरातील प्रथम ग्रँडरिसेप्शन ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
Tags
पनवेल