पनवेल(प्रतिनिधी) टाटा स्टीलने आपल्या खोपोली प्लांटमध्ये बॉयलर ट्यूब्ससाठी ब्लॉकचेन-आधारित टेस्ट सर्टिफिकेट सत्राचे आयोजन नुकतेच केले होते. यावेळी स्टीम बॉयलर, महाराष्ट्र:टाटा स्टील आणि कंपनीच्या चॅनेल पार्टनर्समधील वरिष्ठ अधिकारी या सर्टिफिकेशन सत्रासाठी उपस्थित होते.
बॉयलर उद्योग क्षेत्रामध्ये नियमन अतिशय काटेकोर आहे, याठिकाणी सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. बॉयलर ट्यूब्सना इंडियन बॉयलर रेग्युलेटर टेस्ट सर्टिफिकेट दिले जाते ज्यावरून त्यांच्या अस्सलपणाची खात्री पटते.ब्लॉकचेन अंमलबजावणीमुळे ग्राहकांना टाटा स्टीलच्या चॅनेल पार्टनरमार्फत डिजिटल टेस्ट सर्टिफिकेट्स जारी केली जाऊ शकतात, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शृंखलेमध्ये डेटा सुरक्षा आणि विक्रीतील पारदर्शकता मजबूत होते. टाटा स्टीलचे मार्केटिंग आणि सेल्स (ट्यूब्स) विभागाचे चीफ सिद्धार्थ मिश्रा यांनी सांगितले, "नाविन्यपूर्ण उत्पादन सुविधा सादर करण्याची प्रदीर्घ परंपरा टाटा स्टीलमध्ये आहे. बॉयलर ट्यूब्ससाठी ब्लॉकचेनवर आधारित टेस्ट सर्टिफिकेट्स सुरु करणारी देशातील पहिली कंपनी टाटा स्टील आहे."
संवादात्मक सत्राच्या शेवटी टाटा स्टील खोपोलीचे एक्झिक्युटिव्ह प्लांट हेड कपिल मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्योगक्षेत्रासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत यावर भर दिला. या सत्रासाठी उपस्थित राहून या अतिशय महत्त्वाच्या वाटचालीत सहभागी झाल्याबद्दल नियामक मंडळ आणि व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले.
Tags
पनवेल