*सातत्याने बदलत असलेल्या वातावरणाचा यंदा आंबा पिकावर मोठा परिणाम*




सध्या वातावरणात सातत्यानं बदल  होत आहे.  या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर  मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं आंबाशेतकरी चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्यावर  तुडतुडा, फळगळ होत आहे. त्यामुळे यंदाच्या आंबा हंगामाची सुरुवात दमदार होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.


बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. आंबा पिकावर देखील बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम होत आहे. कोकणातील आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर अनेक ठिकाणी मोहराला गळती सुरु आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळं आंबा उत्पादनात मोठी घट होणार आहे. अनेक ठिकाणी झाडांना मोहर आलेला नाही तर काही ठिकाणी मोहरामध्ये फळधारणा झालेली आहे. यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळं आंबा बागायतरांवर संकट निर्माण झालं आहे.


थोडे नवीन जरा जुने