मुंबईतील विक्रोळी भागात इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन कामगारांना सुखरुप बाहेर काढले आहे.
विक्रोळीतील श्री सिद्धिविनायक सोसायटीच्या लिफ्ट २३ व्या मजल्यावरुन कोसळली. या अपघातात एकजण ठार झाला असून तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील २३ मजली सिद्धीविनायकमध्ये अपार्टमेंट हायड्रोलिक पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक लिफ्ट २३व्या मजल्यावरून कोसळली. लिफ्टमध्ये चार कामगार होते. लिफ्ट जमिनीवर कोसळल्याने त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून, इतर तीन कामगार जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. या दूर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Tags
मुंबई