*वरंधा घाटात माकडाला खाऊ घालताना पाय घसरून दरीत पडल्याने मंडणगड येथील शिक्षकाचा मृत्यू*




महाड-भोर-पुणे रस्त्यावरील वरंधा घाटात माकडाला खाऊ घालताना पाय घसरून दरीत पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३) सायंकाळी ही घटना घडली.
अब्दुल खुदोबुद्दीन शेख (वय ४१) रा. एरंडी, लातूर असे मृत शिक्षकाचे नाव आहे.


अब्दुल खुदोबुद्दीन शेख हे मंडणगड येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी वरंधा घाटात पाय घसरून ते ३८० फूट खोल दरीत पडले. बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. परंतु दरी खूप खोल असल्याने आणि काळोख वाढल्याने शोधकार्यात अडचण येत होती. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास दरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने