इंटक व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा ६ जानेवारीला उत्साहात साजरा होणार




काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नेतेमंडळींची उपस्थिती लाभणार

मेळाव्याच्या पूर्वतयारीनिमित्त पनवेल काँग्रेस भवनात बैठकीत नियोजन पूर्ण

पनवेल:
          संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. युवक आणि महिला उत्साहाने पक्षात काम करताना दिसून येत आहेत. पक्षात सर्वांची एकजूट महत्वाची आहे. यासाठी आपापसातील मतभेद, हेवेदावे दूर करा. काँग्रेस सोडून इतर पक्षात जे गेले आहेत त्यांना त्याठिकाणी सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यांना सन्मानाने पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आणून घरवापसी करा, असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले. ते पनवेल काँग्रेस भवन येथे आयोजित महत्वाच्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.


         इंटक व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार दि.६ जानेवारी रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाटयगृहात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीनिमित्त आज (मंगळवार दि.३ जानेवारी) पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ६ जानेवारी रोजी आयोजित इंटक व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळाव्यादरम्यान पनवेल शहर जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा, पनवेल अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक तसेच पनवेल उरण तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार, हात से हात जोडो अभियानासंदर्भात माहिती व नियोजन, अन्य पक्षातून कॉंग्रेसमध्ये येणाऱ्यांचा पक्ष प्रवेश यासह विविध महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.


          याप्रसंगी ठाण्याचे माजी महापौर तथा पनवेल शहर जिल्हा काँग्रेस निरीक्षक सुभाष कानडे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभिजीत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, ऍड.अरुण कुंभार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अखलाख शिलोत्री, तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रे, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, नौफिल सय्यद, मोहन गायकवाड, लतीफ शेख, मल्लिनाथ गायकवाड, अरविंद सावळेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




थोडे नवीन जरा जुने