रेल्वेची ठोकर लागून इसमाचा मृत्यू



पनवेल दि.०७ (संजय कदम) : मानसरोवर रेल्वे स्टेशन ते खारघर रेल्वे स्टेशन दरम्यान लोकल रेल्वेची धडक लागून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची नोंद पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


     सदर इसमाचे अंदाजे वय ४५ वर्षे असून, उंची ५ फूट ५, अंगाने सडपातळ, रंग काळासावळा, डोकीचे केस काळे वाढलेले, दात- शाबूत डोळे काळे बारीक, नाक- सरळ बारीक तर अंगात उभ्या रेषा असलेला पांढरा फुल शर्ट, काळया रंगाचा हाफ बुरमडा त्यावर सफेद निळया रंगाचा टॉवेल गुंडाळलेला असा पेहराव आहे. सदर इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.०२२-२७४६७१२२ किंवा सहाय्य्क पोलीस निरीक्षक अजित कणसे यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने